ग्राम विकासाचा ध्यास घेऊन काम करा; चंद्रकांतदादांचा सरपंचांना सल्ला

पुणे – पुणे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत त्यांचा जाहीर सत्कार समारंभ, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता, शुभारंभ लॉन्स, म्हात्रे ब्रिजजवळ, एरंडवना, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलतांना पुणे जिल्हयाचे पालक मंत्री पाटील यांनी नवनियुक्त सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम केले पाहीजे त्यासाठी पालकमंत्री म्हणुन मी सर्वोतोपरी सहकार्य करेल, चांगल्या कामाच्या मागे सरकार उभे राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले तर सुत्रसंचालन संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी केले.

यावेळी ऊपस्थितांना हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल ,माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, शरद बुट्टे पाटील यांनी केले यावेळी कांचन कुल, आशाताई बुचके, पृथ्वीराज जाचक, बाबाराजे जाधवराव, प्रदीप कंद , अविनाश मोटे, ई. प्रमुख मान्यवर ऊपस्थित होते तसेच भाजपाचे सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी हजर होते. जालिंदर कामठे यांनी आभार मानुन कार्यक्रम संपला .