Death of Abdul Karim Telgi : अब्दुल करीम तेलगीचा मृत्यू खरंच एड्समुळे झाला का ?

Death of Abdul Karim Telgi – अब्दुल करीम तेलगी हा हजारो कोटी रुपयांच्या बनावट स्टँप घोटाळ्याचा सूत्रधार होता. 2017 मध्ये बंगळुरूमधल्या व्हिक्टोरिया रुग्णालयात दीर्घ आजारानंतर मृत्यू झाला. खोटे स्टँप छापून त्यांची विक्री केल्याप्रकरणी तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. 2001 मध्ये अब्दुल करीम तेलगीला अजमेरमध्ये पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. 2000 मध्ये बेंगळुरूमध्ये बनावट स्टॅम्प पेपर विकताना पकडलेल्या दोन लोकांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या अटकेनंतर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.

सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांकडे होते मात्र नंतर ते  सीबीआयकडे (CBI)सोपवण्यात आले. अब्दुल करीम तेलगीच्या देशभरात 36 मालमत्ता असल्याचे आढळून आले. 18 देशांमध्ये 100 हून अधिक बँक खाती उघडण्यात आली होती. हा घोटाळा  हजारो कोटींचा होता, ज्याने संपूर्ण देश हादरला होता.

अब्दुल करीम तेलगीच्या मृत्यूबाबत अनेक चर्चा होत असतात. अनेकांना त्याचा मृत्यू हा घातपात वाटतो. काहींच्या मते त्याच्यामुळे अनेकांना धोका निर्माण झाला होता यामुळे त्याला एड्सचे इंजक्शन देण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला तर काहींच्या मते त्याचा मृत्यू न्युमोनियामुळे झाला होता. याबाबत नेमकं सत्य काय हे जाणून घ्यायचे असेल ते आझाद मराठीला तेलगीचे वकील मिलिंद पवार (Milind Pawar) यांनी दिलेली मुलाखत नक्की पहा. हि मुलाखत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. किंवा आमच्या युट्युब आणि फेसबुक पेजवर देखील पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या

‘2024 मध्ये आधी मोदी मग अमित शहा होणार पंतप्रधान, योगी गृहमंत्री होणार’

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील; बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल