Amol Kolhe | अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं – खासदार अमोल कोल्हे

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवाराणवर खोचकपणे अप्रत्यक्ष टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं असे अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, २०१९ मध्येही शिरूर लोकसभेत शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं. त्यावेळी मी इथून खासदार झालो. आताही शिरूर लोकसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना आव्हान देण्यात आलं. यावेळी सुद्धा आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही, असेही ते म्हणाले. दिल्लीतून गुबूगुबू म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे वाघ खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा, असेही अमोल कोल्हे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन