शरद पवार यांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याची धमकी? रोहित पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar: शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरुन काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा मोठा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रोहित पवार यांनी नेमका आरोप काय केला?

“अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करतेय. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं”, अशा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐतिहासिक! रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताचा इंग्लंडवर सर्वात मोठा विजय, ४३४ धावांनी जिंकली कसोटी

Sunetra Pawar | सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान निर्माण करणाऱ्या सुनेत्रा पवार नेमक्या कोण आहेत?

Ambernath | धक्कादायक ! चोरीच्या संशयातून दोन तरुणांना जमावानं बेदम मारहाण करून संपवलं