Vijay Vadettiwar | ड्रग्जचा विळखा, हत्यांची मालिका, डान्सबारमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Vijay Vadettiwar – छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने (Shinde Govt) मोठी प्रगती केली असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी विधानसभेत केला.अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचा आशिर्वाद आहे. चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. लोकप्रतिनीधी पोलीसांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले जातात. हे दुर्दैव आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल