पुणे-मुंबई पासून जवळ ‘या’ दोन ठिकाणी करा नवीन वर्षाची सुरवात !

पुणे : थोडा फेरफटका मारायला घरच्या बाहेर पडल्यावर कळत कि शहरात निवांत जागाच राहिली नाही. जिथं थोडी बहुत फिरायला जागा आहे पण गर्दी अशी आहे कि निवांत बसायचं म्हणजे अवघड ! कामाच्या गरबडीतून शांतता मिळाली नाही तर आयुष्य गोंधळात कधी निघून जाईल कळायचं नाही. म्हणून आम्ही आपल्यासाठी अशी दोन दोन ठिकाणे शोधली आहेत. जे तुम्हाला एक चांगला अनुभव देतील शिवाय ते तुमच्या बजेट मध्ये असतील.

भंडारदरा धरण

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे पुणे मुंबईच्या जवळ असूनही अनेकांना इथे चांगली सहल होऊ शकते हे माहित नाही. भंडारदरा मध्ये सध्या टेन्ट कॅम्पिंगसाठी लांबून लोक येत असतात. टेन्ट कॅम्पिंग च्या हेतूने आला तर तशी सगळी सोय इथे उपलब्ध आहे. राहण्यासाठी टेन्ट मिळतात. व्हेज-नॉन व्हेज दोन्ही पद्धतीचे जेवण मिळते. जाण्या येण्याचं फक्त नियोजन केलं तरी बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. भंडारदरा धरणाच्या जवळ तळ्याच्या शेजारी टेन्ट टाकून रात्रभर राहण्यात वेगळीच मजा आहे. रात्री शेकोटी समोर बसून गप्पा रंगताना ही वेळ संपावी नाही अशी वाटते. मोकळ्या आकाशाकडे शेवटी एकटक कधी पाहिलं हे जरा आठवा आणि जास्त विचार न करता भंडारदरा टेन्ट कॅम्पिंगचा अनुभव घ्या.

bhandardara

पवना लेक कॅम्पिंग

मुंबई आणि पुणे पासून जवळपास समान अंतरावर हे एक मस्त ठिकाण आहे. एक दीड तासात पवनाला पोहचू शकता. सध्या इथे टेन्ट कॅम्पिंगसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कुटुंबासोबत बिनधास्त येऊ शकता भंडारदरा आणि पवना दोन्ही ठिकाणे सुरक्षित आहेत. अजिबात कसलीही काळजी न करता इथे बिनधास्त टेन्ट कॅम्पिंगला नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणार असाल तर यासारखे नवीन वर्षाचे चांगले स्वागत होणार नाही. टेन्ट कॅम्पिंगचा अनुभव कायम लक्षात राहील असा आहे. इथे आल्यावर मोबाईल कडे तुमचे न सांगता दुर्लक्ष होईल. टेन्टच्या बाजूला तळ्यात पाय सोडून जवळच्या माणसाशी गप्पा मारण्याचं सुख काय असतं ते इथं आल्यावरच कळतं. टेन्ट, चहा, नाश्ता आणि जेवण अगदी स्वस्तात इथे मिळतं. यायची तसदी घ्या आणि अनुभवांची शिदोरी घेऊन जा.

lake camping

टेन्ट कॅम्पिंगचा तुमचा अनुभव सुरक्षित आणि मजेशीर रहावा यासाठी Adven4insta टेन्ट कॅम्पिंगची सेवा देणारे खात्री करून संपर्क क्रमांक देत आहोत. 8805913006 या मोबाईल नंबर वर कॉल किंवा व्हाट्स अँप करून आजचा आपल्या टेन्टची नोंद करा. Facebook Page link-https://www.facebook.com/adven4insta

lake camping