तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको, आम्हालाही आमच्या घरासमोर भोंगा नकोय – मनसे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या (Residence of Chief Minister Uddhav Thackeray Matoshree) बाहेर हनुमान चालीसा (Hanumaan chalisa) पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांनी व्यक्त केल्यानंतर त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. नवनीत राणा यांच्या खारमधील इमारतीबाहेर शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. मात्र, तरीदेखील आपण इमारतीमधून बाहेर पडून मातोश्रीला जाणार आणि तिथे हनुमान चालीसा पठण करणारच, असा निश्चत नवनीत राणा यांनी बोलून दाखवला आहे.

राणा यांच्या खार (Khar) येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स (Barricades) तोडून इमारतीत घुसले आहेत.या आक्रमक शिवसैनिकांना रोखण्यात पोलीस (Mumbai Police) सपशेल अपयशी ठरले.सध्या राणा  यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु आहे. पोलीस सध्या हतबल झाल्याचे दिसत असून  शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घातला.

दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मनसेने (MNS)  शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सेनेवर टीका करत चिमटे काढले आहेत. ते म्हणाले, तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा (Loudspeaker) नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब ? असं देशपांडे म्हणाले आहेत.