बंद झालेली महापौर चषक स्पर्धा पुढील दोन महिन्यात आयोजित करणार, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Mangalprabhat Lodha : कोविड कालावधीत बंद पडलेला महापौर चषकचा विषय क्रीडा महाकुंभ स्पर्धेच्या निमित्ताने समोर आला आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येत्या दोन महिन्यात मुंबईकरांसाठी महापौर चषक सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेतील, स्पर्धकांचा उत्साह विविध खेळांमुळे द्विगुणित झाला, यावेळी मंत्री लोढा बोलत होते.

छत्रपती शिवाजी पार्कमधील लंगडी स्पर्धेदरम्यान या क्रीडा महाकुंभची संकल्पना आखणारे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासमवेत यावेळी मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे देखील उपस्थित होते.

२६ जानेवारी रोजी सुरु झालेला हा क्रीडा महाकुंभ पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असून, स्पर्धेत स्पर्धकांकडून उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला जात आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त चंदा जाधव, मनपा शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, माजी नगरसेविका अक्षता तेंडुलकर ह्या देखील याप्रसंगी उपस्थित होत्या, तसेच क्रीडा प्रेमींनी ही यावेळी हजेरी लावली.

महत्वाच्या बातम्या-

Vijay Thalapathy | सुपरस्टार विजय थलपतीची राजकारणात एन्ट्री, पक्षाचीही केली घोषणा; पाहा लोकसभा लढवणार का?

Supriya Sule | …म्हणून देवेंद्र फडणवीसांची तक्रार सुप्रिया सुळे आता थेट अमित शाह यांच्याकडे करणार

Eknath Shinde | मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली महेश गायकवाड यांची भेट, रुग्णालयात जाऊन प्रकृतीची केली विचारपूस