मनीष कश्यपची ९ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका, तुरुंगाबाहेर प्रचंड गर्दी

Manish Kashyap : मनीष कश्यपची अखेर सुटका झाली आहे. तुरुंगातून सुटकेचा आदेश दिल्यानंतर पाटणाचे मॉडेल सेंट्रल जेल असलेल्या बेऊर तुरुंगाच्या मुख्य गेटवर मनीष कश्यपच्या समर्थकांची आणि चाहत्यांची गर्दी झाली (Manish Kashyap Released From Jail) होती. शेकडो लोकांच्या प्रचंड गर्दीने बेऊर तुरुंग प्रशासनाच्या अडचणी वाढल्या. बिहारमधील अनेक भागातून त्यांचे समर्थक फुले व हार घालून स्वागत करताना दिसले.

पाटणा उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाच्या आधारे बाँड भरल्यानंतर आर्थिक गुन्हे युनिटच्या विशेष न्यायालयाने मनीष कश्यपला तुरुंगातून बाहेर येण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कोठडीत असताना हातकडी घालून पत्रकारांना जबानी दिल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष न्यायाधीश सारिका बहलिया यांनी हा आदेश दिला आहे. पाटणा दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानंतर मनीषच्या समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. ज्यावेळी तो कोर्टातून बाहेर आला तेव्हा तो रडताना दिसला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मिळून ‘रडू नका, रडू नका’ असे आवाहन केले.

तमिळनाडूमध्ये बिहारमधील लोकांविरुद्ध हिंसाचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनीष कश्यपवर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. मनीषने हे व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चॅनलवर बनावट पद्धतीने दाखवल्याचा आरोप होता. तामिळनाडू पोलिसांनी हे व्हिडिओ खोटे ठरवून गुन्हा दाखल केला होता. तामिळनाडू सरकारनेही त्याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई केली होती.

यानंतर मनीषने दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी तामिळनाडू सरकारने एनएसए काढण्यास नकार देत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला होता.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली