महाराष्ट्राचे दाजी अडकले कोरोनाच्या विळख्यात, रावसाहेब दानवेंनी कोरोनाची लागण !

जालना : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. या विळख्यात राजकीय नेते देखील अडकले आहेत. राज्यात अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. याआधीच राज्यातील ७० हुन अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह झालेलं आहेत. त्यात आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

रावसाहेब दानवे यांनी ट्विट करत याबाबाद माहिती दिली आहे. रात्री उशिरा ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विट करत ते म्हणले की, कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आयसोलेशन मध्ये आहे,याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी,त्याच प्रमाणे माझ्या संपर्कात असलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.