हार्दिक पंड्या दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार? रोहित पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनणार?

Hardik Pandya, IPL 2024 Mumbai Indians: आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी काहीही ठीक होताना दिसत नाही. प्रथम, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनावर चाहते निराश झाले आहेत. आता संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, हार्दिकसाठी आयपीएल 2024 मध्ये खेळणे कठीण आहे. हार्दिक पांड्याबाबतच्या या अपडेटनंतर चाहत्यांना आशा आहे की रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा संघाचे कर्णधारपद स्वीकारू शकेल.

पंड्या आयपीएल 2024 ला मुकू शकतो
कर्णधारपद मिळाल्यामुळे हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्याच्यासंदर्भातील एका मोठ्या अपडेटमुळे त्याच्याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा वाढली आहे. वास्तविक, हार्दिक पंड्या 2023च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला होता. घोट्याच्या दुखापतीमुळे हार्दिकला संघाबाहेर राहावे लागले. त्या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात तो अखेरचा खेळताना दिसला होता आणि त्याच सामन्यात तो जखमी झाला होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी हार्दिक तंदुरुस्त होण्याची अपेक्षा होती, परंतु पीटीआयच्या अहवालानुसार, अष्टपैलू खेळाडूला टी-20 मालिका आणि अगदी आयपीएलचा भाग बनणे कठीण आहे. पीटीआयने बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, हार्दिकच्या फिटनेस स्थितीबाबत अद्याप कोणतेही अपडेट नाही आणि तो कधी पुनरागमन करू शकेल हे सांगणे कठीण आहे.

सगळ्यांच्या नजरा रोहितकडे
रोहित शर्माचा कर्णधारपदाचा वारसा संपवून हार्दिकची अलीकडेच आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. रोहितच्या या फॉरमॅटमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिकने टी-20 इंटरनॅशनलमध्येही भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. पण तो तंदुरुस्त नसल्याने सूर्यकुमार यादव हा भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार आहे. तथापि, सूर्याबद्दल देखील एक मोठे अपडेट आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसत असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली