‘काँग्रेसचं राजकारण पहिल्यापासूनच तुष्टीकरणाचं राहिलंय, हाच कित्ता आता कर्नाटकातलं सरकार गिरवतंय’

Chitra Wagh: कर्नाटकचे काँग्रेस सरकार शाळा आणि महाविद्यालयांमधून हिजाब बंदीचा जुना आदेश मागे घेणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील हिजाबवरील बंदी (Hijab Ban) मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, महिलांना काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे.

काँग्रेसपूर्वी कर्नाटकात भाजपचे सरकार होते ज्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. भाजपच्या या आदेशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर 23 डिसेंबरपासून कर्नाटकातील हिजाब बंदीचा नियम रद्द होणार आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी त्यांच्या म्हैसूर सभेत ही घोषणा केली आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजप कपडे, पोशाख आणि जातीच्या नावावर लोकांना वेगळे करते. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने ही बंदी मागे घेण्याचे संकेत दिले होते.

भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचं राजकारण पहिल्यापासूनच तुष्टीकरणाचं राहिलंय. हाच कित्ता आता कर्नाटकातलं त्यांचं सरकार गिरवतंय.असे वाघ यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा भाग नसल्यामुळे कर्नाटकातील तत्कालीन भाजप सरकारने हिजाबवर बंदी घातली होती. कर्नाटक उच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य ठरवला होता. पण, एका वर्गाच्याच लांगुलचालनाची सवय लागलेली काँग्रेस सत्तेत आल्यानंतर लगेच आपल्या मूळच्या वळणावर आलीय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हिजाबबंदीचा निर्णय मागे घेतलाय. विशिष्ट पोशाखावरून राजकारणाची पोळी भाजणारी काँग्रेस या निर्णयामुळे सपशेल उघडी पडलीय असे वाघ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली