‘मंत्रालयातील  कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे उद्धवजी हे कदाचित पहिलेच मुख्यमंत्री असावेत’

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्वाची घडामोड घडली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दीड-दोन वर्षांनंतर आज मंत्रालयात (Mantralaya) गेले होते. आजारपण तसेच कोरोनामुळे राज्याचं प्रशासकीय कामकाज गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवास्थान (Varsha Bungalow) आणि सह्याद्री अथितीगृहातूनच केलं होतं.

विशेष म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकांनाही मुख्यमंत्री व्हिडीयो काँनफर्सिंगद्वारे उपस्थित होते.मात्र अखेर त्यांना वेळ मिळाला आणि मुख्यमंत्र्यांचे पाय मंत्रालयाला लागले.  उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात विविध विभागांना भेटी दिल्या आणि कामकाजाविषयी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तसेच सूचनाही दिल्या.

दरम्यान, या घटनेचे देखील कौतुक करताना शिवसेनेचे नेते थकत नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande)  यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला. त्या म्हणाल्या, मंत्रालयातील विविध विभागात प्रत्यक्ष जाऊन कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे मा उद्धवजी ठाकरे हे कदाचित पहिलेच मुख्यमंत्री असावेत असा दावा त्यांनी केला आहे.