Rohit Pawar : राजकारण डोळ्यासमोर ठेवून आदित्य ठाकरेंवर आरोप : रोहित पवार

Nagpur – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नुकतेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतले आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 फोन आल्याचा दावा राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. मुंबई पोलिसांच्या तपास AUचा उल्लेख अनन्या उधास आहे. तर बिहार पोलिसांच्या तपासात AU चा उल्लेख आदित्य उद्धव असा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळं त्याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केली आहे.

दरम्यान, शेवाळे यांनी मर्मावर बोट ठेवल्यानंतर आता खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shevale) कधी संसदेत बोलत नाहीत. काल बोलून त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा मांडण्याऐवजी मुंबईतील निवडणुका (BMC) डोळ्यापुढे ठेवून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले. मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करुन असे खोटे आरोप होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.