पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Pune Loksabha: पुणे लोकसभेचे तिन्ही उमेदवार आज वाडेश्वर कट्ट्यावर एकत्रित आले. भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), कॅांग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), आणि तूर्तास अपक्ष उमेदवार असलेले वसंत मोरे (Vasant More) यांना निमंत्रित करण्यात आलं होते.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे, पुणे लोकसभेसाठी रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचारही जोरात सुरू आहे, निवडणुकांच्या दरम्यान आपणच कसे योग्य उमेदवार हे सांगताना दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत असतात, मात्र पुण्यात आज हे उमेदवार चक्क एकमेकांशी विकासाच्या गप्पा मारताना दिसले.

पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि सोबतच अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणारे वसंत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकाच टेबलवर गप्पा मारतांना आणि पुण्याच्या प्रश्नावर चर्चा करतांना दिसले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

एरवी एकमेकांवर राजकीय मंडळी चिखल फेक करतात पुण्यात मात्र थोडी वेगळी परंपरा आहे, राजकीय पक्षातील नेत्यांचे मतभेद आहेत मात्र मनभेद असता कामा नये या दृष्टीने राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो, आणि त्याच दृष्टीने वाडेश्वर कट्टा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे, याच कट्ट्यावर आज पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेल्या या तीनही उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं यावेळी या उमेदवारांनी उपस्थित अशी मनमोकळा संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार