राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलीसांनी ‘असे’ केले जेरबंद

पुणे – पुण्यातील कोथरूड परिसरातून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं. दोघेही मागील दीड वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड आहेत. मात्र पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८/०७/२०२३ रोजी शास्त्रीनगर बीट मार्शलवरील पोलीस अंमलदार, प्रदिप चव्हाण व अमोल नजन (Pradeep Chavan and Amol Najan) हे शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीत रात्रगस्त घालत असताना रात्री ०२:३० मिनिटांनी तीन संशईत दुचाकी चोरांना ताब्यात घेवुन रात्रपाळीचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रविण कुलकर्णी यांना कळविले. त्यानंतर त्यांनी पोलीस अमलदार, बालारफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शितकाल (Balarfi Sheikh, Aniket Jamdade, Dnyaneshwar Panchal, Vaibhav Shitkal) यांची टिम तयार करून संशईत इसमांना घरझडतीसाठी नेण्यात आले.

दरम्यान, आपले बिंग फुटणार हे लक्षात आल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केल. या दरम्यान ते पळून गेले असता  बालारफी शेख यांनी पाठलाग करून आरोपी युनूस साकी यास पकडले. तसेच पोलिस अंमलदार नजन यांनीही पाठलाग करून आरोपी इम्रान खान यास पकडले. मात्र एक आरोप पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी अंमलदार पांचाळ ,शितकाल व जमदाडे यांनी देखील आरोपींना पकडण्यासाठी मदत केली. त्यानंतर अंमलदार  मंगेश शेळके यांनी तांत्रिक तपास करून ते आरोपी  NIAकडे वॉन्टेड असलेले व प्रत्येकी पाच लाख बक्षीस असल्याबाबत बाबत माहिती मिळवली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 3 सुहेल शर्मा, सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग टेळे साहेब यांनी या पथकाला मार्गदर्शन केले.

विशेष म्हणजे घरझडती मध्ये एक जिवंत काडतूस, चार मोबाईल, एक लॅपटॉप व इतर कागदपत्रे मिळुन आली. त्यामध्ये संशईत हे देशविघातक कृत्यास सहभागी असल्याचा संशय आल्याने अधिक तपास करता ते राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचेविरूध्द कोथरूड पो स्टे येथे गुरनं. १७५/ २०२३. भा. दं.वि.सं. कलम ४६८, ३७९, ५११, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५) महाराष्ट्र पोलिस अॅक्ट क.३७ (१) ३७ (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त,  रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे  सुहेल शर्मा यांनी वरील कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे बोलावुन त्यांना पुष्पगुच्छ देवुन त्यांचा सन्मान केला आहे. तसेच यापुढे देखील त्यांनी अशीच उत्तम कामगिरी करावी यासाठी मार्गदर्शन केले.सोबतच टीमला मोठे बक्षीस देणार आहोत तसेच NIAकडून दोन्ही आरोपी वरील बक्षीस रक्कम टीमला मिळणार असे माननीय पोलीस आयुक्त यांनी स्वतः सांगितले आहे अशी माहिती मिळत आहे.