महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

आरक्षणाच्या निर्णयामुळेच आज महिला सैन्यात संरक्षण खात्यात मी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता

Sharad Pawar – महिलांनो समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP National President Sharad Pawar) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया  सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री तथा आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रवक्त्या विद्या चव्हाण (NCP National Working President Supriya Sule, State President Jayantrao Patil, Party National General Secretary Jitendra Awad, Former Minister and MLA Anil Deshmukh, Former Minister and MLA Rajesh Tope Women State President Rohini Khadse, Spokesperson Vidya chavan) यांची उपस्थित होती

शरद पवार म्हणाले की, अनेक तास बसून देखील कोणी सभागृहाच्या बाहेर गेले नाही. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकूण देखील घेतली आहे. सर्वांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत. यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता.आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झाले की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. तर आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः त्यावेळी संरक्षण मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात सुद्धा दिसत आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले की, ही जमेची एक बाजू आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळे आपल्याला जागरुक राहावे लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठे घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि मग आपण त्या केसेस काढून टाकत असतो, असे आवाहनही शरद पवार यांच्याकडून महिलांना करण्यात आले. आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणे योग्य नाही. असे होतं असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही. सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत हे योग्य नाही, असेही यावेळी शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, सरकारी नोकरीमुळे कुटुंबात स्वास्थ्य असते, परंतु कंत्राटी पदावर नेमले तर तिथे आरक्षण नाही. त्यामुळे मला खात्री आहे. तिथे महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. यावेळी शरद पवार साहेबांनी महिला बेपत्ता होण्याच्या मुद्द्यावरून मत व्यक्त करत बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या आकडेवारीची माहिती दिली. १ जानेवारी पासून १ मे पर्यंत किती महिला बेपत्ता आहेत? याचं उत्तर मिळालं की १९ हजार ५५३ महिला बेपत्ता आहेत. यामध्ये १४५३ मुली या १८ वर्षांखालील असल्याचे शरद पवार साहेबांनी सांगितले. ही माहिती पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांना विधानसभेतून देण्यात आली आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, शाळा खाजगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. आता जी शाळा कंपनी दत्तक घेईल तिला तिचा वापर करता येईल. आता याचे उदाहरण द्यायचे झाले तर नाशिक जिल्ह्यातील एक शाळा मद्य कंपनीला दिली आणि त्यांनी त्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे गंभीर आहे असे शरद पवार  म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन

Lok Sabha 2024 Elections : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा