“अनेकदा मी कमीपणा सहन केला”, अजित पवारांनी बोलून दाखवली मनातील खंत

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अशातच एमईटी कॉलेजमध्ये बैठक घेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यार तोफ डागली आहे. यावेळी अजित पवारांनी आपल्या मनातील खंतही बोलून दाखवली.

जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आम्ही सगळे बंगल्यावर चर्चा झाली. वरिष्ठांना सांगितले सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील बैठकीत होते. कुठली खाती, पालकमंत्री पदे ठरली. निरोप आला, दिल्लीत बोलावले. वरिष्ठांसोबत बैठक झाली. २५ वर्षाचा आमचा मित्रपक्ष त्याला आम्ही सोडणार नाही असं भाजपाने सांगितले. शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा असे सरकार राहील असं भाजपाच्या वरिष्ठांनी सांगितले. तेव्हा शिवसेना नको, ती जातीयवादी आहे असं आमच्या वरिष्ठांनी सांगितले. त्यानंतर हे सर्व बारगळले असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

तर, अनेकदा मी कमीपणा घेतला, माझ्यावर गुगली टाकली तरी मी सहन केली. अनेकदा सांगितलं एक, निर्णय वेगळाच झाला, असे म्हणत अजित पवारांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.