फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल: जरांगे

Devendra Fadnavis: नुकतीच सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याबाबत सर्वांनी एकमत दिले. मात्र सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत करून घेण्याची आपली अजिबात इच्छा नाही. कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत, असे सांगत आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सर्वपक्षीय बैठकीतील ठराव फेटाळून लावला.

तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोलही केला. आपण ठरवले तर ५ मिनिटात फडणवीसांचा आवाज बंद करू, असा इशारा त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

सर्वपक्षीय बैठकीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले, आणखी किती बैठका घेता, इकडे आमची माणसे मरत आहेत. सरकारच वातावरण दूषित करीत आहे. राज्यातील नागरिकांचा सरकारवर रोष आहे. आमचे आंदोलन शांततेत सुरू असून शिंदे-फडणवीस-पवार याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारचीच आहे. आपण काही अरेतुरे बोललो, तर वाईट वाटते. ‘फार बोलू नका,’ असे निरोप येत आहेत. दोन दिवस गोड बोलून बघू. आपण ठरवले तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल, असा थेट इशारा मनोज जरांगेनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना