मराठा समाज पाकिस्तानी आहे की अमेरिकन, त्यांना वाळीत टाकल्यासारखं का करताय? – बच्चू कडू

Bacchu Kadu On Maratha Reservation: काल सह्यांद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत, असा निर्णय घेण्यात आला. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. परंतु मनोज जरांगे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. यादरम्यान आता आमदार बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारला तिखट सवाल केला आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार संघटनेकडून सिंदखेड राजा शहरात रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल चढवला.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, “निवडक मराठ्यांना आपण वाळीत टाकल्यासारखं करतो. तसंही ओबीसीला भेटलेलं आरक्षण कमीच आहे. आमचा वाटा जास्त आहे देशात ओबीसींच आरक्षण ५२ ते ५५ टक्क्यांवर जातं पण आपल्याला २७ टक्के आरक्षण मिळालं आहे.

त्यामुळं ओबीसींना आरक्षण वाढवून द्यावं. त्यासाठी मदत करा किंवा त्यात अबकड अशी वर्गवारी करा. पण नाही म्हणणं हे चुकीचं आहे. मराठा कोण आहे? पाकिस्तानचा आहे की अमेरिकेचा आहे? मग यांचा आरक्षणावर अधिकार का नाही? असा सवालही त्यांनी यावेळी सरकारला विचारला.

महत्त्वाच्या बातम्या-

जावई केएल राहुल नव्हे तर सुनील शेट्टीला आवडतो ‘हा’ खेळाडू, पाहा कोण आहे तो?

अभिनेता रजनीकांत यांचा डाय हार्ड फॅन, उभारलं भव्यदिव्य मंदिर; होतेय सर्वत्र चर्चा

भाजप आमदाराची पत्नी बेपत्ता, शोधासाठी पोलिसांची 6 पथके रवाना