Maratha society | अखिल भारतीय मराठा महासंघाचा भाजपा- महायुतीला पाठिंबा

मराठा समाजाच्या  (Maratha society)न्याय्य हक्कासाठी झगडणा-या अखिल भारतीय मराठा महासंघाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी ही घोषणा केली. महायुतीचे समन्वयक आ.प्रसाद लाड, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, मराठा महासंघाचे ( Maratha society) पदाधिकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष ननावटे, संभाजी दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे,महेश सावंत, अविनाश राणे, परशुराम कासुळे आदी यावेळी उपस्थित होते.

आ.शेलार यावेळी म्हणाले की, मराठा समाज बांधवांची आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार व महाराष्ट्रात महायुती सरकार कटीबद्ध आहे. आरक्षणाच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा याआधीच झाली असून पुन्हा या आठवड्यात चर्चा करून स्पष्टता आणू असेही ते म्हणाले.

अ.भा.मराठा महासंघ अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले की आत्तापर्यंत सर्व निवडणुकांमध्ये महासंघाने भाजपाला पाठिंबा दिला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही पाठिंबा दिला तेव्हा भाजपाला विजय मिळाला आहे. यंदाही भाजपा विजयी होईल. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या सहकार्याने सोडवण्याचा विश्वास वाटल्याने भाजपाला पाठिंबा देत असून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका जगताप यांनी मांडली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब