Ashish Shelar | भाजपाने देशात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर राजकारण सोडाल का? आशिष शेलारांचे थेट आव्हान

Ashish Shelar | भाजपाने देशात 45 पेक्षा अधिक जागा जिंकल्यास तुम्ही राजकारण सोडाल, हा मर्दाचा शब्द द्या. आणि मविआने राज्यात 18 हून अधिक जागा जिंकल्यास मी राजकारण सोडेन, असे थेट आव्हान मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार  यांनी आज दिले. राज्यात आघाडी ४८ जागा जिंकेल तर भाजपा देशात ४५ जागा तरी जिंकेल का या उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा आमदार ॲड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला .

याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की, हे उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विधान रेकॉर्ड करुन ठेवा. उध्दव ठाकरेजी तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करीत असाल तर तुम्हाला माझे जाहीर आव्हान आहे. भाजपाने देशात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर उध्दव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल, असा मर्दांचा शब्द द्या. आणि महाराष्ट्रात तुम्ही आमच्यामुळे गेल्यावेळीस १८ जागा जिंकल्या होतात, यावेळी तुम्ही महाआघाडी म्हणून जर १८ च्यावर गेलात तर मी राजकारण सोडेन. हे माझे खुले आव्हान आहे. जर भाजपा ४५ च्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, अपमान सहन कराल याचा शब्द द्या, असे थेट आव्हान आशिष शेलार यांनी दिले आहे.

दरम्यान, आज लाँच केलेल्या उबाठा गटाच्या गाण्या विषयी माध्यमांनी विचारले असता ती मशाल आहे की, आइसक्रीमचा कोन आहे, लोकांना आता या गर्मी मध्ये आईसक्रीमचा कोन पाहिजे, मशाल नकोय. मशाल, तिची आग आणि धग याला लोक आता कंटाळतील असा टोला त्यांनी लगावला.

उध्दव ठाकरे खोटे बोलत आहेत

उद्धवजी असत्य बोलले आहेत. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांना देण्याबबात चर्चा झाल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याबाबत अमितभाई कधी म्हणाले नाहीत. अडीच वर्षांचा मुद्दा देवेंद्रजीही कधी म्हणाले नाहीत. साधा नियम आहे की, त्या खोलीमध्ये जर दोनच व्यक्ती असतील तर त्यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये दोनच व्यक्ती बोलू शकतात. उध्दवजी म्हणतात ते अमित शाह म्हणत नाहीत कारण उध्दवजी खोटे बोलत आहेत, तरी वादापुरते खरे मानले तरी.. अशा परिस्थितीमध्ये मी वकिल असल्यामुळे युक्तीवाद करतो, जर दोन व्यक्ती आपआपल्या वाक्यावर ठाम असतील तर अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीजन्य पुरावा, समर्थनार्थ आहे का तो पाहिला जातो, असा कुठलाही पुरावा उध्दव ठाकरे यांच्याकडे नाही. ते प्रचारात असताना नरेंद्र मोदी आणि देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले गेले होते, त्या सभांना स्वत: उध्दव ठाकरे उपस्थित होते, आणि त्याला कुठेही आक्षेप घेतलेला दिसून येत नाही. त्यामुळे उध्दव ठाकरेच खोटे बोलत असून स्वत:चे खोटे पचवण्याचा हा प्रयत्न आहे, असेही आमदार ॲड आशिष शेलार म्हणाले.

महाराष्ट्रात घरात आलेल्या सुनेला मुलगी मानले जाते

सुसंस्कृत महाराष्ट्रात घरात आलेल्या सुनेला मुलगी मानले जाते, तिच्या रूपाने लक्ष्मी घरात आली हा आदर केला जातो, मुली एवढंच प्रेम तिच्यावर केलं जातं. आपल्या वक्तव्याने पवार साहेबांनी तमाम मराठी आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणार्‍या समस्त मतदारांचं मन दुखावलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब