शुभमंगल सावधान! हार्दिक अन् अक्षयाने बांधली लग्नगाठ, राजेशाही थाटाची सर्वत्र चर्चा

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणादा आणि पाठक बाई ही जोडी आता खऱ्या आयुष्यात एकत्र दिसणार आहे. २ डिसेंबर रोजी पुण्यात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) लग्नबंधनात अडकले आहेत. स्वत: हार्दिक आणि अक्षया लग्नातील आणि लग्नापूर्वीच्या वेगवेगळ्या विधींचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. त्यातही लग्नाच्या दिवशी हार्दिक आणि अक्षया यांनी मराठमोळा लूक करत सर्वांचेच लक्ष वेधले.