महाराष्ट्रासाठी झकास बातमी! ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी, खनिजसंपत्तीत मोठी भर

मुंबई : महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहितीही मिळाली आहे.

राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.