पिझ्झा, बर्गरमध्ये एक्स्ट्रा Cheese खाताय, पण हे जिभेला पाणी आणणारं Cheese कशापासून बनतं? घ्या जाणून

मुंबई: २१व्या शतकात तरुण पिढी पिझ्झा (Pizza), बर्गर (Burger), सँडविच (Sandwich) अशा फास्ट फूडचे (Fast Food) मोठ्या प्रमाणात सेवन करताना दिसत आहे. पिझ्झा असो फ्रेंच फ्राइज असो वा बर्गर किंवा सँडविच असो, त्यावर एक्स्ट्रा चीज टाकून खायला अनेकांना आवडते. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का, की तुम्ही खात असलेले चीज (Cheese) कसे बनते? त्यात वापरले जाणारे रेनेट काय असते? ते शरीरासाठी चांगले असते का? या लेखात आम्ही तुम्हाला चीजशी संबंधित सर्व माहिती देणार आहोत.

चीज हा दुग्धजन्य पदार्थ आहे, म्हणजेच ते दुधापासून बनवले जाते. दही, ताक, पनीर आणि तूप जवळपास सर्वच पदार्थ घरात दुधापासून बनवले जातात. चीजचा वापर पिझ्झा, बर्गर, सँडविच आणि इतर अनेक विदेशी पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. पनीर हा देखील एक प्रकारचा चीज आहे, परंतु आपल्याला माहित आहे की, दूध नासवून त्यातील पाणी काढून टाकले जाते आणि उर्वरित प्रथिने दाबून पनीर बनवले जाते. पनीर मऊ असते, पण ते एक-दोन दिवसांत वापरावे लागते, नाहीतर ते खराब होते.

परंतु चीज (Cheese Making), जे घट्ट असते जे जास्त काळ ठेवण्यासाठी बनवले जाते. चीज बनवण्याच्या प्रकियेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. येथे जाणून घेऊया चीज कसे बनवले जाते? (How Cheese is made)

चीज कसे बनवले जाते? (How To Make Cheese)
चीज बनवण्यासाठी भरपूर ताजे क्रीम किंवा फॅट असलेले दूध वापरले जाते. ते एका विशिष्ट तापमानाला गरम केले जाते. नंतर त्यात थोड्या प्रमाणात ऍसिड टाकून आम्लयुक्त बनवले जाते. यानंतर, त्यात रेनेट टाकले जाते. रेनेट टाकल्याने थोड्याच वेळात दूध फाटते व ते घट्ट होते. रेनेटमुळे दूध इतके घट्ट होते की, त्याला कापता येऊ शकते. मग हे घट्ट झालेले दूध कापून त्यातून पाणी काढून टाकले जाते, नंतर त्यात मीठ टाकून, त्याला एक विशिष्ट आकार देऊन, ते अनेक महिने कोरडे वापरण्यासाठी ठेवले जाते. अशा प्रकारे तयार केलेले चीज कापून पॅक करून बाजारात विकले जाते.

चीज खाण्याचे फायदे व नुकसान पाहूया…

चीजचे फायदे (Cheese Health Benefits)
चीजमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. शरीराची सर्व कार्ये सुरळीत चालण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. मजबूत हाडे आणि मजबूत दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. चीज व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत आहे. याशिवाय यामध्ये झिंक, फॉस्फरस आणि रिबोफ्लेविन देखील पुरेशा प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.

चीजचे तोटे (Cheese Health Disadvantage)
चीजमध्ये भरपूर प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते जे हृदयासाठी चांगले मानले जात नाही.
त्यात कॅलरी जास्त असते ज्यामुळे वजन वाढू शकते.
चीजमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
त्यात लॅक्टोज नावाची साखर असते. काही लोकांना याचा त्रास होतो ज्याला लैक्टोज असहिष्णुता म्हणतात. त्यामुळे गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
काही लोकांना चीजमध्ये आढळणाऱ्या केसिन नावाच्या प्रथिनाची ऍलर्जी असू शकते. अशा लोकांनी चीज खाऊ नये.