Govt Scheme : ‘या’ सरकारी योजनेतून मिळू शकते क्रीडांगण विकासासाठी ७ लाख रुपयांपर्यंत अनुदान

क्रीडांगण विकास अनुदानासाठी पात्र संस्था
–  शासकीय विभाग, शासनामार्फत होणारी क्रीडा संकुले, स्थानिक स्वराज्य संस्था यांना १०० टक्के अनुदान, स्वहिस्सा आवश्यक नाही.
– आदिवासी भागातील खाजगी संस्थांना जास्तीत जास्त ७ लाख रुपये किंवा अंदाजित खर्चाच्या ९० टक्के अनुदान.

अनुदान मर्यादा
–  क्रीडांगण विकासासाठी जास्तीत जास्त ७ लाख रुपये किंवा अंदाजित खर्चाच्या ७५ टक्के.
– क्रीडा साहित्यासाठी जास्तीत जास्त 3 लाख रुपये.

क्रीडांगण अनुदानासाठी निर्माण करावयाच्या आवश्यक सुविधा, बाबी

–  क्रीडांगण समपातळीत करणे
– २०० मीटर, ४०० मीटर धावन पथ
– क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण
–  विविध खेळाचे एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे
–  प्रसाधनगृह, चेजिंग रुम
–  पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा
– क्रीडा साहित्याची खरेदी व साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह
–  क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा
–  मातीचा/ सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षकगृह/ आसन व्यवस्था
– प्रेक्षकगृह / आसन व्यवस्थेवर छत
–  क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था
–  निर्मित सुविधांच्या अनुषंगाने मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा
– मैदानावर रोलिंग करण्यासाठी मिनी रोलरची खरेदी

संपर्क:- जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय क्रीडा संकुल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे-६, [email protected] या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.