Poonam Pandey | पूनम पांडेला मरणाचं ढोंग पडणार महागात, लवकरच अटक होण्याची शक्यता

Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) नुकतीच तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अभिनेत्रीने नंतर एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की तिने गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी हे कृत्य केले होते. त्याचबरोबर सर्वजण या अभिनेत्रीच्या या कृत्याचा तीव्र निषेध करत आहेत. दरम्यान ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेही अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पूनम पांडेला स्वत:च्या मृत्यूचा बनाव भारी पडणार आहे. 24 तासांत लेखी माफीनामा सादर करावा, अन्यथा कामबंद आंदोलन करू अशी वेस्टर्न इंडिया सिनेकामगार (Western India Filmmaker) संघटनेची मागणी आहे. अन्यथा पूनम पांडेचा सहभाग असलेल्या कुठल्याही शूटमध्ये सहभागी न होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर अभिनेत्रीच्या एजन्सी श्बांगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या संपूर्ण प्रकरणावर माफी मागितली आहे.

पूनम पांडेच्या एजन्सीने माफी मागितली
पूनम पांडेच्या एजन्सी श्बांगने गेल्या आठवड्यात अभिनेत्रीच्या मृत्यूच्या प्रसिद्धी स्टंटबद्दल सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे. एजन्सीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये माफी मागितली आणि लिहिले, “होय, हॉटरफ्लायच्या सहकार्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी पूनम पांडेच्या पुढाकारात आम्ही सहभागी होतो. सुरुवातीला, आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करू इच्छितो – विशेषत: ज्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.”

एजन्सी पुढे म्हणाली, “आमच्या कृती एकल मिशनद्वारे चालविल्या जातात. 2022 मध्ये, भारतात 123,907 गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि 77,348 मृत्यूची नोंद झाली. स्तनाच्या कर्करोगानंतर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील मध्यमवयीन महिलांना प्रभावित करणारा दुसरा सर्वात घातक आजार आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण पूनमच्या स्वतःच्या आईने कॅन्सरशी धैर्याने लढा दिला आहे. तिच्या इतक्या जवळच्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात अशा आजाराशी लढण्याच्या आव्हानांना सामोरे गेल्यानंतर, तिला जागरूकतेचे महत्त्व समजते”

महत्वाच्या बातम्या –

विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!, निखील वागळेंचे टीकास्त्र

आम्ही शांत आहोत म्हणजे त्याचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही, भुजबळांचा विरोधकांना इशारा