‘मविआची 2 वर्षे.. जनतेची दिशाभूल आणि प्रचंड भ्रष्टाचाराची’

पुणे – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत तर विरोधीपाक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, तिन्ही पक्षातील धुसफूस,महिला सुरक्षा आदी मुद्द्यांवर म्हणावी तेवढी चांगली कामगिरी सरकारला करता आली नसल्याची टीका विरोधक करत आहेत. तर कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या कामगिरीचा दाखला देत महाविकास आघाडीतील नेते स्वतःच्या सरकारचा बचाव करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता भाजप सोशल मीडिया,आय टी संयोजक प्रविण अलई यांनी सरकारच्या एकंदरीत कारभारावर टीकास्त्र सोडले आहे.ते म्हणाले, मविआ ची 2 वर्षे.. जनतेची दिशाभूल आणि प्रचंड भ्रष्टाचाराची आहेत.राज्यात अपघाताने आलेल्या त्रिपक्षीय मविआ आघाडी सरकार सत्तेत आहे की मस्तीत आहे हेच कळेनासे झाले असून…आरे मेट्रो कार शेड प्रकल्प बंद पाडून प्रकल्पाची वाट लावून टाकली आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेली जलयुक्त शिवार योजना बंद करून एक इतिहास घडविला. पोलिसांना हाताशी धरून अराजकता माजवित, मग पालघर साधू हत्याकांड असो की करमुसे ची जीतूद्दीनने बंगल्यावर नेऊन केलेली मारहाण असो, मात्र मोदी-शाह यांना औरंगजेब-शाहिस्तेखान, मोगली फौजा बोलत ठाकरे कुटूंबातील कोणाला पेंगविन संबोधले म्हणून त्याला पोलिसांकरवी मारझोड केली गेली.

महाराष्ट्रातील सर्व विकास कामे स्थगित केली, मग तो मुंबई-नागपूर समृद्धी मार्ग असो की, राज्यातील इतर महामार्ग असो, सगळं ठप्प करून ठेवण्यात मविआ आघाडी चे सरकार यशस्वी झाले आहेत.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तर सोशल मीडिया तील वक्तव्यावरून सोशल मीडियातील काही लोकांची चौकशी करण्या संदर्भात विधानसभेत भाष्य केले होते, मात्र त्यांच्यावरच खंडणीच्या आरोपाखाली चौकशी अन कारवाही करतांना लपंडाव अख्या महाराष्ट्रातील जनतेणे पाहिला.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री यांचे बाबत घडलेले प्रकरण म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका. यांचे पदाधिकारी महिलांची छळवणूक करण्यात त्रस्त आणि नेते पाठीशी घालण्यात व्यस्त. तर कसे दिसेल यांना महाराष्ट्रा चे दुर्भाग्य?

यांच्या पक्षातील खासदार स्वतःच्या फायद्यासाठी कारखाना विक्री ला काढतात? आपल्या निकटच्या व्यक्ती ला विक्री ही करतात? त्यास त्यांच्या च सहकारी संस्थेतुन कर्जपुरवठा ही पुरवतात किती हा भ्रष्टाचार? म्हणजेB दूध पितेमिटुनी जात मांजराची असे म्हणावे का? वसुलीकार घोटाळे वा कुठल्यातरी गुन्ह्यात अडकल्यामुळे कित्येक मंत्री राजीनामे देऊन बाहेर व काही आत आहेत. अजूनही बऱ्याच मंत्र्यांची नावं बाहेर येतील ही. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, मुख्यमंत्र्यांचा विश्वासू सचिन वाझे हे महावसुली आघाडीचे मर्सिनरी बनले की काय? अंबानीच्या घराखाली जिलेटीन ठेवित व धमक्या देत वसुलीचा हाहाकार राज्यात माजविला.

दिशा सलीयन, सुशांतसिंग राजपूत वगैरे प्रकरणं निर्माण झाली व ती दाबून टाकण्यासाठी या मविआ सरकारनं कसली कंबर कसली हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितले. मुस्लिम तुष्टीकरण पार खालच्या पातळीवर नेऊन ठेवित, राज्यातील उद्योजकांना व व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात कुठलीच कमतरता राखली नाही. कोरोना महामारीत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवित एक विक्रमी नोंद घडवून आणली.  ‘राज्य चलाना मठ चलाने इतना आसान नही’ असे उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टोमणे मारनार्यानी राज्याची दुर्दशा करून टाकली. केलेल्या वचनपूर्तीचा विसर पडला, मग ते कोविड काळातील डॉक्टरांचं ₹.१,२०,०००/- चं मानधन असो, का रिक्षावाल्यांचे ₹.१,५००/- असो का केंद्राकडून फुकट मिळालेल्या धान्याचं वाटप असो अर कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.

राज्य वाहतुक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस जाबाबदार मविआ सरकार आणि त्यांच्या नेत्यांनी संप अनेक दिवस चिघळत ठेवित,  पगारवाढीचे आश्वासन देऊन पगारवाढ केरून जणु उपकार केल्यागत थाटात निर्लज्जपणे सांगत सुटले आहेत. आणि कामावर हजर न झाल्यास पगारवाढ रद्द करण्याची धमकी आणि कार्य समाप्ती व निलंबनाची धमकी देणारे परिवहन मंत्री अनिल परब हे तुमच्या कारभाराचे दुसरे मूल्यांकन म्हणावे का? राज्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, मालेगाव येथील जातीय दंगली व महाराष्ट्र पोलिसांची नंतरची बोटचेपी कारवाई व नेत्यांची लपाछपी किती दुर्दैवी होती हे तुमच्या कारभाराचे तिसरं मूल्यांकन म्हणावे का? आणि पगारी पत्रकार संजय राऊत यांना मुलाखत काय दिली, नित्य प्रत्येक वसुलीकार मंत्र्यांची सारवासारव करण्यासाठी पत्र परिषद घेत सकाळच्या वेळी आरवणी केल्यागत जनतेसमोर प्रकट होतात. किती करा भ्रष्टाचार मात्र महाराष्ट्राची जनता घेईल समाचार! अशी जहरी टीका अलई यांनी केली आहे.