कोविडमध्ये लाखो लोकांचे मृत्यु होत असताना सिरम कंपनीकडून मोदींना कोट्यवधी रुपयांचा हप्ताः Rahul Gandhi

Rahul Gandhi On Narendra Modi- नरेंद्र मोदी (Narendra Modi) भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या (Electpral Bond) माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला, ते पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठो खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात.याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात. शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का ? महाराष्ट्र, गोवा राज्यातील सरकार पाडण्यात याच इलोक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले पण या सोहळ्याला आदिवासी, दलित, मागास, गरिब समाजातील कोणालाही बोलावले नाही. नरेंद्र मोदी, मोहन भागवत, फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू, अंबानी, अदानी असे मोजक्या लोकांनाच निमंत्रित केले होते. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उग्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?