एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील विरोधात संभाजी ब्रिगेडचा विद्रोह मोर्चा

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत मंगळवार दि. १४ रोजी संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्या
एमआयएम खा. इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) वतीने भव्य विद्रोह मोर्चा काढण्यात आला. मंगळवार दि १५ रोजी सकाळी १२वा कडक उन्हात छञपती शिवाजी महाराज चौकात छञपती शिवाजी महाराज मुर्तीस पुष्पहार घालुन भव्य मोर्चास आरंभ झाला. शेवटी छञपती शिवाजी महाराज यांची मुर्ती असलेला रथ होता.

शहराच्या प्रमुख मार्गावरुन हा विद्रोह मोर्चा तहसिल कार्यालय येथे आल्यानंतर येथे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धाराशिव शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल भैया गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष किरण राज घाडगे, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ राऊत, स्वराज्याचे महेश गवळी, जीवनराजे इंगळे, कुमार टोले, किशोर गंगणे, सुनिल नागणे, अर्जुन साळुंखे, अमरराजे कदम, कुमार टोले, महेश चोपदार, उद्धव साहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, धनराज बिराजदार, बालाजी यादव, उमरगा अण्णासाहेब महादेव मगर आदिंनी यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे यांना निवेदन दिले.

यावेळी एमआयएम खा. इम्तियाज जलील राजे संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबचे उदात्तीकरण करु नये, राजेसंभाजीनगर नावास विरोध करु नये, अन्यथा या विरोधाला जसास तसे उत्तर दिले जाईल, असा इषारा अनेक मान्यवरांनी विद्रोह मोर्चाक-यांपुढे बोलताना यावेळी दिला.
यावेळी बोलताना किरणराजे घाडगे म्हणाले कि हिंदू हा धर्म आहे, तर सनातन काय आहे, याचा खुलासा भाजपाने करावा. हिंदू धर्मा बाबतीत भाजपाने डबल खेळु नयेअसा इषारा यावेळी दिला.

तहसिल कार्यालयासमोर शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देवुन त्यांची छायाचित्रे असलेल्या फलकास जोडे मारण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी स्विकारले. त्यानंतर हा मोर्चा स्वराज्यरक्षक छञपती संभाजीराजे पुतळ्या जवळ विसर्जित झाला.