MLA Disqualification Case Verdict  : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर 

Shivsena MLA Disqualification Case Verdict  : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) दिला आहे. पक्ष हा बहुमताच्या आधारे ठरवला जातो आणि बहुमत हे शिंदे गटाकडे आहे असंही नार्वेकर म्हणाले. तर भरत गोगावले यांचाच व्हिप योग्य असल्याचा निकालही त्यांनी दिला.

दरम्यान, या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उध्दव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो.

ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना( UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. असे त्यांनी म्हटले आहे. निकाल काहीही लागला असला, तरी ह्या प्रवृत्तीविषयी आपण मिळुन लढू असं देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

Amit Thackeray : अमित ठाकरेंचा अपमान केल्याने महेश जाधवांना ‘प्रसाद’ दिला – देशपांडे

डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला पुण्यात आयोजन

आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा- धीरज घाटे