आम्ही आजही तुमचा उल्लेख साहेब असा करतोय पण …; नरेश म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना निर्वाणीचा इशारा

ठाणे – आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घटनाबाह्य मुख्यमंत्री असा उल्लेख केला त्याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री घटनाबाह्य वाटणाऱ्यांचं वक्तव्य अतिशय बालीश असून त्यांनी कोणत्याही अभ्यासाशिवाय ते केले आहे.असं त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, 2019 साली राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचे सोडून युतीच्या घटनेचे उल्लंघन करून स्वतःला मंत्री आणि वडीलाना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत घटनाबाह्य आघाडी कुणी स्थापन केली. वरळीमधून निवडून आलेले सुनील शिंदे यांना तिकीट नाकारून त्यांनी केलेल्या आयत्या कामावर आपण निवडून आलात तेव्हा आपण सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय करतोय असे आपल्याला वाटले नाही का..? आम्ही आजही तुमचा उल्लेख साहेब असा करतोय पण आपण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अशाप्रकारे उल्लेख केलात तर आम्हाला देखील आमचा संयम सोडावा लागेल.असं त्यांनी म्हटले आहे.