युवकांच्या गांधीगिरी स्टाईल आंदोलनाला यश; मुर्दाड प्रशासनाचे अखेर डोळे उघडले

कंधार / विनायक आंधळे – नांदेड-कंधार-बिदर (Nanded-Kandahar-Bidar) जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 (National Highway No. 50) याची दयनीय अवस्था झाली होती. या संबंधित वेळोवेळी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कुठलीही दखल घेण्यात आलेली नव्हती. म्हणून बहाद्दरपुरा ते जंगमवाडी या रोडवर ११ जुलै २०२२ रोजी सर्व तरुणांनी साखरवाटून आंदोलन करून लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला होता. या गांधीगिरी स्टाईल आंदोलनाला (Gandhigiri style movement) मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते याप्रसंगी बेशरमाची झाडे (Shameless trees) लावून सर्व वाहन चालकांना साखर वाटप करण्यात आली होती.

आता युवकांच्या या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. अखेर आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने या रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात वापरण्याजोगे रस्ता करून दिला आहे. लवकरच कायमस्वरूपी रस्ता होईल अशी अशा या युवकांना आहे.

या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी, रविकांत चिवळे, सागर मंगनाळे, नितिन कोकाटे, ओम पेठकर (Ravikant Chivale, Sagar Manganale, Nitin Kokate, Om Pethkar,), साईनाथ मळगे, सुनिल कांबळे, बालाजी चुकूलवाड, संभाजी कल्याणकार, नवनाथ वाखरडकर, स्वप्निल परोड़वार, अजिंक्य पांडागळे, बाळू फिसके, गुरुनाथ मुळे, तालिबलाला, गणेश उदगिरवाड, विनायक सावरकर, हरिदास बसवते, साईनाथ जोगळे, दिपक भंडारे, प्रमोद गायकवाड, माधव गायकवाड, रघूनाथ गायकवाड, मनोज गळे, साहेबराव गायकवाड, सयाजी गायकवाड, साहेबराव निवघेकर, किरण गायकवाड आदी तरुण सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांकडून या युवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.