मोदींनी एवढ्या संस्था विकल्या आणि आम्हाला विचारतात 60 वर्षात तुम्ही काय केलं ?

परभणी – नरेंद्र मोदी यांनी एवढ्या संस्था विकल्या, पण ते आम्हाला विचारतात की आम्ही 60 वर्षांत काय केलं, तेच विकून तर तुम्ही सरकार चालवत आहात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद तथा कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

गरीबांना मोफत सिलेंडर देतो म्हणून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिले, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलं. यांचा फोटो असतो पेट्रोल पंपावर. मोदींना फक्त जाहिरातबाजी करता येते, असं सुळे म्हणाल्या.

त्यांना मला स्वर्गीय सुषमा स्वराज यांची आठवण करून द्यायची आहे. त्या जेंव्हा विरोधी पक्षात होत्या तेंव्हा सिलेंडर 400 रुपये होत. आता हजारांच्यावरती गेलं आहे, याचं भान आहे का त्यांना, असेही त्या म्हणाल्यात. सोबतच राज्यातील भाजप नेते उठसूट आमच्यावर टीका करत आहेत. त्यांना दुसरं कामच राहील नाही.असं देखील त्या म्हणाल्या.