त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे – शिवेंद्रराजे भोसले 

 सातारा –  राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

संभाजीराजेंच्या या आरोपामुळे शिवसेना संभाजीराजे समर्थक आणि भाजपच्या निशाण्यावर आली आहे.   छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे, असं वक्तव्य भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (BJP MLA Shivendra Raje Bhosale) यांनी केलं.

छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असंही शिवेंद्रराजे म्हणाले. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केलं या प्रकरणावर शिवेंद्रराजे भोसले संभाजीराजे यांनी वरील प्रतिक्रिया दिली.