लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव करावा लागेल – कॉंग्रेस

Opposition on ED Action: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईबाबत विरोधी पक्षाचे नेते केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या अटकेनंतर आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. ईडीने बुधवारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेते हेमंत सोरेन यांना कथित जमीन फसवणूक प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) आरोपावरून सात तासांहून अधिक चौकशीनंतर अटक केली. अटकेपूर्वी हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात (Opposition on ED Action) नेण्यात आले आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) ताब्यात घेण्यात आले.

हेमंत सोरेन यांचा राजीनामा आणि अटकेनंतर, विरोधी पक्ष इंडिया अलायन्सच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी संध्याकाळी भेट घेतली आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा आणि सोरेन यांच्या अटकेनंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram Yechury), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) सुप्रिमो शरद पवार (Sharad Pawar) आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) नेते टीआर बाळू आणि इतर नेते उपस्थित होते.

खरगे म्हणाले, ‘पीएमएलएच्या तरतुदी कडक करून विरोधी नेत्यांना धमकावणे हा भाजपच्या टूल किटचा भाग आहे. एका षड्यंत्राचा भाग म्हणून विरोधकांची सरकारे एकामागून एक अस्थिर करण्याचे भाजपचे काम सुरू आहे. भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले, ‘भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जे गेले ते स्वच्छ, जे गेले नाही ते कलंकित आहे. लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव करावा लागेल.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी; मेळाव्यांचा लावला धडाका

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

‘प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार’