Narayan Rane | खाईन तर तुपाशी, मी अडीच लाखांच्या रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी होणार; नारायण राणेंचा विश्वास 

Narayan Rane | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाहीये  मात्र तरिही केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) या मतदारसंघात प्रचार सभांचा धडाका सुरु केलाय.

अशातच सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांना संबोधित करताना नारायण राणे यांनी आपण अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. आतापर्यंत मी सर्व पदं ही रेकॉर्ड ब्रेक करून मिळवली आहेत. आताही सिंधुदु्र्गमधून मला किमान अडीच लाख मतांनी विजय मिळाला पाहिजे, असे नारायण राणेंनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात