IND vs ENG | तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग 11 मध्ये होणार बदल, ‘हा’ खेळाडू बाकावर बसणे निश्चित!

IND vs ENG : 23 फेब्रुवारीपासून इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात येणार आहे. दोन कसोटीत फ्लॉप झाल्यानंतर रजत पाटीदारचे संघातून बाहेर पडणे निश्चित मानले जात आहे. रजत पाटीदारच्या जागी केएल राहुल संघात परतणार आहे. दुखापतीमुळे केएल राहुल (KL Rahul) मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीचा भाग होऊ शकला नाही. सध्या टीम इंडियाकडे मालिकेत 2-1 अशी आघाडी आहे. तिसऱ्या कसोटीत मालिका काबीज करण्याकडे भारताचे लक्ष असेल.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर रजत पाटीदारचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला. मात्र, रजत पाटीदारला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली नाही. पण केएल राहुल बाद झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीसाठी रजत पाटीदार प्लेइंग 11 चा भाग बनला. रजत पाटीदारने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 32 धावांची खेळी केली. यानंतर रजतची बॅट सपशेल अपयशी ठरली आणि त्याला 4 डावात एकही अर्धशतक झळकावता आले नाही. त्यामुळे रजत पाटीदारच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केएल राहुल जबरदस्त फॉर्मात आहे
त्याच वेळी, केएल राहुलने मर्यादित षटकांच्या संघासह कसोटीतही मधल्या फळीत आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत केएल राहुलला प्रथमच मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळाली. राहुलने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले होते. यानंतर केएल राहुलने इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्या कसोटीतही 86 धावांची उत्कृष्ट खेळी केली. पण दुखापतीमुळे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला. आता केएल राहुल तंदुरुस्त आहे आणि प्लेइंग 11 मध्ये परतण्यास तयार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना इंग्लंडने जिंकला होता. पुढचे दोन सामने जिंकून भारताने जोरदार पुनरागमन केले.

महत्वाच्या बातम्या-

Jayant Patil भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

भाजपसोबत युती करणार का?; आशिष शेलार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे काय म्हणाले?

मनसे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह जाणार? आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चर्चा