Department Meteorology | कोकणासह राज्यातील ‘या’ भागात आज अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

Department Meteorology | राज्याच्या विविध भागात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच उष्णतेची लाट जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यताही वाढली आहे. गेल्या १५ दिवसात राज्यात १३ रूग्णांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये सर्वाधिक चार व्यक्ती बीड इथल्या आहेत; अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपुर, धुळे आणि साताऱ्यातही प्रत्येकी एक रूग्णाची नोंद झाली आहे. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

वाढत्या उन्हाळ्यात नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, वारंवार पाणी प्यावं, शेतात दुपारची कामं टाळावीत, झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा असं आवाहन धुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी केलं आहे. दरम्यान सातारा शहरासह परिसरातील काही भागात काल दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली वाढली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यात काल तापमानाचा पारा चाळिशीच्या पार गेला होता.

दरम्यान सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं (Department Meteorology) वर्तवली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल