Uddhav Thackeray | बरं झालं आज तरी ‘गंगेत घोडं न्हालं’, नितीन गडकरींना उमेदवारी मिळताच उद्धव ठाकरे बरळले

Uddhav Thackeray On Nitin Gadkari | भाजपाने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना नागपूर लोकसभा मतसंघातून (Nagpur Lok Sabha Constituency) उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत नाव नसलेल्या नितीन गडकरींना दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गडकरींना लोकसभेची उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सुरुवातीला देशात भाजपचे फक्त दोन खासदार होते. त्यावेळी लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासह नितीन गडकरींनी पक्षाचा विस्तार केला”.

“मात्र, आज भाजपला निष्ठावंत नेत्यांचा विसर पडला असून दुसऱ्या यादीत गडकरींना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. बरं झालं आज तरी “गंगेत घोडं न्हालं”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार