Balwant Wankhede | नवनीत राणा यांचा ३ लाख मतांनी पराभव होणार,अमरावतीत परिवर्तन होणार

Balwant Wankhede | भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. असे असतानाच आता महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरावतीत नवनीत राणांचा ३ लाख मतांनी पराभव करू, असा दावा त्यांनी केला आहे.

नवनीत राणा या कालपर्यंत अमरावती जिल्ह्याच्या सून होत्या. आता म्हणतात मी मेळघाटची बेटी झाल्या आहेत… पाच वर्षांत कसं नात बदलू शकतात? जात प्रमाणपत्र तर खोटं आहेच आणि नातं ही खोटं सांगतात… अमरावती मधील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे.त्यात जनशक्तीचा विजय होईल. खासदार नवनीत राणा 3 लाख मतांनी विजयी नाही तर पराभूत होतील. आता विजय सत्याचा होईल. अमरावतीत परिवर्तन होईल, असे वळवंत वानखेडे यांनी म्हटले आहे.

अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडीची काय ताकद आहे. हे आज विरोधकांना दाखवून देऊ. कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपचा अंतर्गत विषय आहे कोणाचेही आव्हान माझ्या समोर नाही. पाच वर्षे राणांची केवळ अरेरावी सुरु होती. त्यांनी नौटंकी केली. या निवडणुकीत एकतफरी माझा विजय होणार आहे. विकासाचे मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पुर्ण झाले नाहीत. त्यामुळे लोकांना आता परिवर्तन हवं आहे. त्यामुळे लोक महाविकास आघाडीला मतदान करतील. विजय माझाच असेल, असं वानखेडे म्हणालेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल