सोनू सूदने पत्नीच्या वाढदिवशी व्यक्त केली भावना; म्हणाला माझे आयुष्य…

 नवी दिल्ली : रिअल लाइफ हिरो सोनू सूदची पत्नीचा शनिवारी 48 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटोसह एक लव्ह नोट शेअर करून पत्नी सोनाली सूदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, ‘जानु तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे आयुष्य पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या आयुष्यातील मजबूत आधारस्तंभ असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, माझे ऐकल्याबद्दल आणि माझी प्रेरणा बनल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच करेन.

अभिनेता सोनू सूदची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे. आतापर्यंत (वृत्त लिहिपर्यंत) या पोस्टला 6.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सोनू सूदने 1996 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी सोनाली सूदसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले इशांत आणि अयान आहेत.

त्याचवेळी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना भेटताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, भूपेश बघेल सर म्हणाले आता तरी खलनायकाची भूमिका करू नका, फक्त नायकाची भूमिका करा.

दुसरीकडे, त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो पुढील वर्षी चंदप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि मिस युनिव्हर्स मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यशराज फिल्म्सच्या एन्टरटेनमेन्ट करत आहे.