परभणीच्या नम्रता मुंदडाची मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड

परभणी – राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020 चा अंतिम निकाल लागला असून या परभणी येथील नम्रता विजयकुमार मुंदडा (Namrata Vijayakumar Mundada) या विद्यार्थिनीने मुलींमध्ये सामान्य गुणवत्ता यादीत राज्यात 10 वा तर ईडब्ल्यूएस मध्ये राज्यात 4 था क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. तिची मंत्रालय मुंबई येथे कक्ष अधिकारी (सेक्शन ऑफिसर) पदी निवड झाली आहे. कक्ष अधिकारी म्हणून यश मिळवले असले तरी या यशाला हुरळुन न जाता उपजिल्हाधिकारी होण्यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याचे नम्रताने सांगीतले आहे.

परभणी येथील जेष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा (Senior journalist Vijaykumar Mundada0) यांची कन्या नम्रता  मुंदडा हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परभणी येथील सारंग स्वामी विद्यालयात (Sarang Swami Vidyalaya) झाले आहे. उच्चमाध्यमिक शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पूर्ण झाले आहे.तर अभियांत्रीकीची पदवी पुणे विद्यापीठातून घेतली आहे.लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या नम्रताने अधिकारी व्हावे अशी तिच्या आई स्व.सौ.उज्जला मुंदडा यांची इच्छा होती.अभियांत्रीकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नम्रता हिने आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुणे तर कधी परभणीत राहुन विक्रीकर अधिकारी असलेले  मोठे बंधु सतिश मुंदडा (Satish Mundada) यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली. अभ्यासातील सातत्य,मनात असलेल्या जिद्दीच्या जोरावर नम्रताने हे यश संपादन केल्याचे त्यांचे बंधु विवेक मुंदडा व विशाल मुंदडा (Vivek Mundada and Vishal Mundada) यांनी सांगीतले.

राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC) 2020  मध्ये पार पडल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर अंतिम निकाल लागला. त्यात  शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल महिनाभर आधी जाहीर करण्यात आला होता. २९ एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. तिची मंत्रालय मुंबई येथे कक्ष अधिकारी (सेक्शन ऑफिसर) पदी निवड झाली आहे.या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व आप्तेष्टांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.