भाजपामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले – नाना पटोले

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील इतर मागास वर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण गेले, हे पाप भारतीय जनता पक्षाचेच आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधानसभेत आज ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले त्याची सुरुवात २०१७ साली झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचेच सरकार होते. ओबीसींचे आरक्षण धोक्यात जाण्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली त्याचे पाप भाजपाचेच आहे. हा प्रवास २०१७ सालापासून सुरु झाला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लागली असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे आहे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. २०१८ साली हाय कोर्टाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले.

हे देखील पहा