Nana Patole | मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; भाजपाचा दारूण पराभव अटळ

Nana Patole | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे भाजपाचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे, जनतेला खोटी आश्वासने देऊन फसवले. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार, उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले, कामगारांना देशोधडीला लावले, महिलांना फसवले, त्यामुळे जनतेत मोदी सरकारविरोधात तीव्र संताप आहे. हा संताप प्रचारावेळी दिसून आला. देश विकून देश चालवला त्याला विकास म्हणणार का? गब्बरसिंग टॅक्स आणून जनतेला लुटले व मुठभर धनदांडग्यांचे खिशे भरले याला विकास म्हणतात का? असे सवालही पटोले यांनी उपस्थित केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला