Nana Patole | वंचितने सातत्याने अपमान केला पण वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची

Nana Patole | भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन होऊन भाजपाचा फायदा हेऊ नये यासाठी वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न केला परंतु वंचितकडून सातत्याने आपला अपमान केला, टॉर्चर केले परंतु वैयक्तीक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या सभेत नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले. नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, अपमान केला गेला असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण वंचितने वेगळी भूमिका घेतली. भारतीय जनता पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण बदलत आहे. जीएसटीच्या माध्यमातून गरिबांकडून पैसे वसुल करून मुठभर श्रीमंतांचे खिसे भरत आहे. नोट बंदी व जीएसटीने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. काँग्रेस मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठीच भाजपाकडून मतविभागणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस प्रदेध्यक्ष नाना पटोले, खासदार चंद्रकांत हंडोरे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, आ. अमित झनक, आ. नितीन देशमुख, माजी आमदार गुलाबराव गावंडे, हेमंत देशमुख, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे, ॲड.परवेज डोकाडिया, कपिल रावदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार