Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चांगलीच लढत होणार आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हे यांनी सलग तीन टर्म वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) लोकसभेची निवडणुक लढत  आहे, मात्र यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर उतरले आहेत. तर डॉ. कोल्हे (Amol Kolhe) राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फुट, राज्यात झालेले राजकीय बदल यामुळे ही निवडणुक चांगलीच चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेनेसह राष्ट्रवादी पक्षात देखील मोठी फुट पडली असून याचा फटका उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. २०१९ साली अमोल कोल्हे यांनी जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर (Shirur LokSabha 2024) येथे आघाडी घेतली होती. तर भोसरी आणि हडपसर येथे आढळराव पाटलांना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं. आता शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच आमदार महायुतीत सहभागी आहेत. अशातच जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील तर खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे याठिकाणी आढळराव पाटलांना ताकद मिळण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या बाजूला हडपसर आणि भोसरी विधानसभेत मागच्यावेळी आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळालं होतं. यावेळीही भोसरीचे आमदार महेश लांगडे तर हडपसरचे आमदार चेतन तुपे हे महायुतीत आहेत. त्यामुळे याठिकाणांहूनही आढळराव पाटलांना लीड मिळणार असल्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसोबत असलेले एकमेव आमदार अशोक पवार यांनी कोल्हेंना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे याठिकाणी आढळराव पाटलांची ताकद अधिक दिसून येत आहे.

दरम्यान, भोसरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मोशी, चिखली, चऱ्होलीस भोसरी गावठाण या भागात २०१९ च्या निवडणुकीत आढळराव पाटलांना एक लाख २५ हजार ३३६ मते तर कोल्हे यांना ८८ हजार २५९ मते मिळाली होती. आढळरावांनी याठिकाणी ३७ हजार ७७ मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे याठिकाणांहून यंदा आढळरावांना पुन्हा आघाडी मिळणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत