पुणे : कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर कारमधून चोरीला

पुणे – महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर बुधवारी त्यांच्या कारमधून चोरीला गेले. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहियानगर परिसरात त्यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचे पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चोरट्यांनी कारमध्ये प्रवेश करण्यासाठी डुप्लिकेट चावी बनवून किंवा अन्य पद्धतीचा वापर करून वाहनाचा दरवाजा उघडून रिव्हॉल्व्हर चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

खडक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट म्हणाले, ही घटना 25 ते 26 डिसेंबर दरम्यान घडली. आम्हाला २९ डिसेंबरला तक्रार मिळाली. एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.