Prakash Ambedkar | नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप

Prakash Ambedkar | महाविकास आघाडीने म्हणावा तितका सन्मान न केल्याने दुखावलेल्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभा करण्याचा धडाका लावला आहे. नुकतीच त्यांनी वंचितच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

उद्या आमच्या पाठिंबामुळे कोण जिंकणार तो भाग वेगळा असणार. पण आजच्या पत्रकार परिषदेतून सांगतोय नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार, याचं प्रचंड दुःख झालं आहे. म्हणून त्यांनी आरोप केला की वंचितनं म्हणजेच ‘आम्ही’ जो पाठिंबा दिला तो गडकरींना हरविण्यासाठी दिला. दरम्यान नाना पटोले आणि भाजपच्या काही नेत्यांसोबत असलेला संबंध यातून उघड झाला आहे.

आंबेडकर पुढे म्हणाले की, काँग्रेसने पटोलेंना भंडारा गोंदियातून उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी का माघार घेतली. हे आता समोर येतंय. कारण त्यांना भाजपसोबत लढायचं नव्हतं. दरम्यान काँग्रेसमधल्या काही कार्यकर्ते आणि नेत्यांचे छुपे संबंध भाजपच्या नेत्यांशी आहेत. काँग्रेसचा उमेदवार जिंकणार यापेक्षा नितीन गडकरी हरतील याच दुःख त्यांना होतंय, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी पटोलेंवर केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका