शालेय पोषण आहारात अंडी नकोच, जैन समाजाचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Eggs in nutrition Food In Schools: काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील एका शाळेत शिक्षकाने ब्राम्हण विद्यार्थीनीला बळजबरी अंडे खाऊ घातल्याचा प्रकार घडला होता. यानंतर आता राज्य शासनाने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा अध्यादेश मागे घ्यावा, या मगणीचे निवेदन सकल जैन समाजाने आणि शाकाहारी शिष्टमंडळाने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना दिले.

शालेय पोषण आहारत विद्यार्थ्यांना उकडलेली अंडी किंवा अंड्याचा पुलाव देण्याचा निर्णय अंडी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिताचा असला तरीही राज्यातील जैन समाज, वारकरी संप्रदाय आणि शाकाहारी लोकांच्या मनाला ठेच पोहोचवणारा आहे. पूर्ण शाकाहारी असलेल्या नागरिकांची येणारी पिढी मांसाहारी बनवण्याचे शासनाचे षडयंत्र आहे. सकल जैन समाज आणि शाकाहारी नागरिक हे कदापि सहन करणार नाहीत. हा अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा, नाहीतर सकल जैन समाज आणि शाकाहारी लोक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा व भाजपाचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार